सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥
अर्थ
संत तुकाराम महाराज म्हणतात कि, माझे डोळे सदाही तुझ्या मूर्ती रूपावर जडलेले असावेत जो रखुमाई चा पती आणि माझा सोयरा आहे.
तुझ्या नावासोबत तुझे रूप पण गोड आहे. आणि हेच मला कोणत्या हि काळा मध्ये प्रेम देतात.
विठोबा माउली तू मला नेहमी हेच वरदान दे कि मुं नेहमी तुमच्या हृदयात संचारत राहूदे .
शेवटी महाराज म्हणतात कि मला आणखी काही दुसरे मागायचे नाही. मला तुझ्या पायातच सर्व सुख प्राप्त आहे.
***********************************************************************************
