।।२।।
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥
अर्थ
अतिशय सुंदर असे ध्यान आहे. त्या ध्यानामध्ये असं दिसून येतं कि आपला विठोबा कामेरवर हात ठेऊन विटेवर उभा आहे.
तुळसीचे हार गळ्यामध्ये शोभत आहे. पितांबर अंगावर नेसलेला हा विठ्ठल सुशोभित दिसत आहे. हेच रूप मला नेहमी आवडते.
मासोळी च्या आकाराचे कुंडल कानामध्ये शोभून दिसत आहेत. गळ्यात कौस्तुभमणी चा हार शोभून दिसत आहे
संत तुकाराम महाराज म्हणतात कि हे पाहण्यात जे सर्व सुख असलेले देवाचे रूप पाहण्यात जी आवड आहे ते कशातच नाही.
***********************************************************************************
No comments:
Post a Comment