Saturday, 2 August 2025

तुका म्हणे ...।।३।।




।।३।।


सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥
गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥
विठो माउलिये हा चि वर देईं । संचरोनि राहीं हृदयामाजी ॥२॥
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक । तुझे पायीं सुख सर्व आहे ॥३॥


अर्थ 

          संत तुकाराम महाराज म्हणतात कि, माझे डोळे सदाही तुझ्या मूर्ती रूपावर जडलेले असावेत जो रखुमाई चा पती आणि माझा सोयरा आहे. 

        तुझ्या नावासोबत तुझे रूप पण गोड आहे. आणि हेच मला कोणत्या हि काळा मध्ये प्रेम देतात. 
        
        विठोबा माउली  तू मला नेहमी हेच वरदान दे कि मुं नेहमी तुमच्या हृदयात संचारत राहूदे . 

       शेवटी महाराज म्हणतात कि मला आणखी काही दुसरे मागायचे नाही. मला तुझ्या पायातच सर्व सुख प्राप्त आहे. 

***********************************************************************************

तुका म्हणे ... ।।२।।



।।२।।



सुंदर तें ध्यान उभे विटेवरी । कर कटावरी ठेवूनियां ॥१॥
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर । आवडे निरंतर तें चि रूप ॥ध्रु.॥
मकरकुंडलें तळपती श्रवणीं । कंठीं कौस्तुभमणि विराजित ॥२॥
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख । पाहीन श्रीमुख आवडीनें ॥३॥



अर्थ 




       अतिशय सुंदर असे ध्यान आहे. त्या ध्यानामध्ये असं दिसून येतं कि आपला विठोबा कामेरवर हात ठेऊन विटेवर  उभा आहे. 

       तुळसीचे हार गळ्यामध्ये शोभत आहे. पितांबर अंगावर नेसलेला हा विठ्ठल सुशोभित दिसत आहे. हेच रूप मला नेहमी आवडते.  
     
      मासोळी च्या आकाराचे कुंडल कानामध्ये शोभून दिसत आहेत. गळ्यात कौस्तुभमणी चा हार शोभून दिसत आहे 

    संत तुकाराम महाराज  म्हणतात कि हे पाहण्यात जे सर्व सुख असलेले देवाचे रूप पाहण्यात जी आवड आहे ते कशातच नाही. 


***********************************************************************************

Friday, 1 August 2025

तुका म्हणे ....

माझं हे नवीन ब्लॉग आहे. जे भारतातातील थोर संत तुकाराम महाराज यांच्या अभंगाच अर्थ लिहिण्याचे प्रयत्न करत आहे जर काही चूक झाली तर क्षमा असावी.   

।।१।।


समचरणदृष्टि विटेवरी साजिरी । तेथें माझी हरी वृत्ति राहो ॥१॥
आणीक न लगे मायिक पदार्थ । तेथें माझें आर्त्त नको देवा ॥ध्रु.॥
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी । तेथें दुश्चित झणी जडों देसी ॥२॥
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म । जे जे कर्मधर्म नाशवंत ॥३



अर्थ 

          मन हे खूप अस्थीर असतो त्याच मानाला एकाग्र करण्या साठी, पांडुरंगाचे चरण विटेवरी आहेत त्या चरणावर सामान नजर ठेऊन, त्याच चरणावर माझं मन स्थिर राहूदे. मनाला स्थिर ठेव भगवंता. 

         भौतिक पदार्थाची गरज भासू देऊ नकोस, भौतिक पदार्था मुळे लोभ निर्मण होतो व त्या लोभास  बळी ना पडता  माझी एवढीच आकांक्षा आहे ते पूर्ण कर. 

        ब्रह्मादिक म्हणजे मोठे पद मला देऊ नकोस, कारण त्या पदामुळे खुप दुःख व त्रास भोगावा लागतो, अर्थात  मोठ्या पदामुळे वाईट विचार मानत  येतात, त्या मुळॆ मानतील एकाग्रता भंग होते. त्याच मुळे  ध्यान भंग होतॊ. 

       संत तुकाराम महाराज म्हणतात कि आम्हाला माहित आहे उच्च पदामुळे काय होते ते. आपण जे कर्म आणि आपलं भक्ती मार्ग असलेलं धर्म नाश पावतो. 

************************************************************************************************************************************

तुका म्हणे ...।।३।।

।।३।। सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती । रखुमाईच्या पती सोयरिया ॥१॥ गोड तुझें रूप गोड तुझें नाम । देईं मज प्रेम सर्व काळ ॥ध्रु.॥ विठो माउलिये ह...